बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

” भाजपमध्ये दलितांना किंमत नाही, राष्ट्रपतींनी नमस्कार केला तर मोदी त्यांची दखल घेत नाही”

नवी दिल्ली | इलेक्ट्राॅनिक माध्यमांवर दररोज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा रंगत असतात. चर्चांपेक्षा या कार्यक्रमात आरोप प्रत्यारोप  जास्त होत असतात. तर काही वेळा या कार्यक्रमात ‘दंगल’ देखील झाल्या आहेत. अशाच एका कार्यक्रमाची चर्चा आता सोेशल मीडियावर चालू आहे. काँग्रेस नेते उदित राज यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. त्यावरून भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला आणि  काँग्रेस नेते उदित राज यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती.

माझी भाजपमध्ये राहण्याची लायकी नाही, असं भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलले होते. त्यावर उदित राज यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी उदित राज यांनी भाजपवर आक्रमकपणे टीका केली होती. तर प्रेम शुक्ला यांनी बोलता बोलता ‘देशाचे राष्ट्रपती दलित आहेत.’, असं बोलून गेले. यावर उदित राज भडकले आणि त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजपमध्ये दलितांना किंमत नाही, राष्ट्रपतींनी नमस्कार केला तरी मोदी त्यांचे आभिवादन देखील स्वीकारत नाही, असा घणाघाती आरोप उदित राज यांनी केला आहे. भाजपनेते राष्ट्रपतींना देखील किंमत देत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर राष्ट्रपती उभे राहतात. संघी लोकांची विचारधारा लोकांना कळली, असा आरोप राज यांनी या कार्यक्रमात केला आहे.

दरम्यान, काँग्रेसमध्ये दलितांना किंमत नाही. काँग्रेसमध्ये तुमची किंमत काय? काँग्रेसने तुम्हाला काय दिलं? असा पलटवार प्रेम शुक्ला यांनी केला. त्यावरून नंतर दोघांमध्ये खूप वेळ वाद रंगलेला दिसला. यावरून समाज माध्यमांमध्ये प्रेम शुक्ला यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! फुलांसारख्या दोन लेकींसह बापाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण!

“नाव परमविरांसारखं आणखी अन संपत्ती हडपतो बकासुरासारखी”

संजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स

“जनताही वेळ येताच सगळा हिशेब चुकता करत असते हे कोणी विसरू नये”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More