महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; मांडणार पूरग्रस्तांच्या व्यथा

मुंबई |  काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ आज बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून पूरग्रस्तांच्या मागण्याचं निवेदन देणार आहे.

सांगली कोल्हापूरचा महापूर ओसरू लागला असला तरी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रचंड बिकट झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हे शिष्टमंडळ पूरग्रस्तांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे.

पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकारतर्फे पूर्णपणे अनास्था दिसत असून अद्याप राज्याला कोणतीही मदत दिली नाही, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारने पूरस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही म्हणून ही स्थिती अधिक बिकट झाली आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंच्या ‘होम मिनिस्टर’ पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!

-“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत… फडणवीस की येडीयुरप्पा???”

पूरग्रस्तांच्या मदतीला उर्मिला मातोंडकर कोल्हापूर-सांगलीत!

-पूरग्रस्तांच्या मदतीला क्रिकेटचा ‘देव’ धावला! इतरांनाही मदत करण्याचं आवाहन

-“तो पराभव मी कधीही विसरू शकत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या