Uddhav Thackeray | लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसं राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. एकमेकांशी आघाडी करुन लढणारे पक्ष आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपविरोधात महाराष्ट्रात (Maharashtra News) एकजूट करणाऱ्या महाविकास आघाडीत देखील जागांवरुन महाभारत घडायला सुरुवात झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीकडे जागांची मागणी केली होती. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 23 जागा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी मागणी फेटाळली!
मागील लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चांगल्या जागा जिंकल्या होत्या, पण त्यांचे अनेक उमेदवार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत, त्यातच शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीकडे मागणी केलेल्या 23 लोकसभा जागा काँग्रेस पक्षाने नाकारल्या आहेत.
काँग्रेस नेत्यांच्या मते, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत बंड झालं, त्यांच्याकडून अनेक नेते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत, त्यामुळे जे नेते साथ सोडून गेले त्यांच्या जागांवर हक्क सांगणं काँग्रेस नेत्यांना मान्य नाही.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले-
इंडिया आघाडीतील सर्व सहकारी पक्षामध्ये एकी असणं गरजेचं आहे. निवडणुकीत प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्या असतात, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena-Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाची 23 जागांची मागणी खूप जास्त होतेय, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?-
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातल्या नेत्यांची वरिष्ठांसोबत दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेमक्या कोणत्या जागा लढणार?, याबाबत चर्चा होणार आहे. शुक्रवारी दोन बैठकांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. आमच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीची जी समन्वय समिती तयार करण्यात आली होती, त्यातल्या सदस्यांसोबत देखील दिल्लीमध्ये बैठक पार पडेल. या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भाने चर्चा होईल. सध्या कोणी कितीही जागांबाबत दावे करत असलं तरी भाजपला रोखायचं असेल तर सर्वांनी एकत्रितरीत्या येऊन लढाई लढायला हवी, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
मग आम्ही काय करायचं?, निरुपमांचा सवाल-
संजय राऊत 23 जागांची यादी घेऊन आमच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर एवढ्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं?, असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीने बारा जागांचे प्रपोजल दिलं आहे, अशा पद्धतीची बातमी मीडियामध्ये पाहिली. एवढ्या जागा ते घेणार असतील तर बाकीच्यांना काय करावे? हा माझा प्रश्न आहे? इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येत आहात, मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) जागांची मागणी काँग्रेस नेत्यांना मान्य नसल्याचं दिसतंय. त्यांनी याबाबत सरळ सरळ उघड नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेत्यांची ही भूमिका उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरु शकते. सध्यातरी ही जागांची मागणी फेटाळणं हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानलं जात आहे.
News Title: congress leaders denied uddhav thackeray demands
महत्त्वाच्या बातम्या-
Maharashtra News | एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, बडा नेता शरद पवारांच्या गळाला?
Ram Mandir | उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; संजय राऊत संतापून म्हणाले…
Aishwarya Rai | ‘…मला खूप सहन करावं लागलं’; अभिषेक बच्चनचा सर्वात मोठा खुलासा!
Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप