काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. गांधी परिवाराचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.

भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे. असं मत काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलं आहे.

विरोधकांनी पुन्हा एकदा भारतीय जवानांचा अपमान केला आहे. 130 कोटी भारतीय जनतेने काँग्रेसला जाब विचारायला हवा, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, काही जण भारतात येवून हल्ले करतात, त्यासाठी संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणार का? असा सवाल करत पित्रोदांनी पाकिस्तानची बाजू मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत!

काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे

मुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार?- उदयनराजे भोसले

-गौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

-‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं!