बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

मुंबई | सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षणाचं वारं वाहू लागलं आहे. त्यात भर म्हणून आणखी काही समाजाने आपल्या आरक्षणाच्या मागण्या मांडण्यास सुरवात केली आहे. त्यातच आता काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी मुस्लिम आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. आरक्षण दिल्याशिवाय मुस्लिम समाजाचं मागासलेपण दुर होणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मुस्लिम समाजाला दिलेले 5 टक्के आरक्षण मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून बहाल करण्यात यावं, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी 28 फेब्रुवारी रोजी अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिलं होतं, परंतु आजपर्यंत या विषयावर कोणत्याही प्रकारचा निर्णय अथवा सरकारतर्फे चर्चा सुद्धा करण्यात आली नाही, अशी टीका त्यांनी नवाब मलिक यांच्यावर केली आहे. मुस्लिम समाजामधील मागासपणा दूर करण्यासाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुस्लीम आरक्षणासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे थेट मैदानात उतरले आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात निदर्शने आंदोलन करण्यात आली. त्यात त्यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा’; दरेकरांचा गंभीर आरोप

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या परिक्षेच्या तारखा जाहीर

“दोन दिवसांत राज्याच्या हिताचं एवढं काम करणारं हे राज्यातील पहिलं सरकार”

‘सुपरमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचं दुःखद निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More