बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मंत्रिपद धोक्यात

मुंबई | काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि नाना पटोले फेब्रुवारी महिन्यामध्ये सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले असताना या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. राज्यातील बिलाच्या मुद्द्यावरून सध्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे चांगलेच अडचणीत आले आहेत.

लॉकडाउनच्याकाळामध्ये 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर ऊर्जामंत्री ठाम असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं. पण आता आपल्या वक्तव्यावरुन मागे फिरत आपण असं कधी सांगितलंच नव्हतं, 100 युनिट विज बिल माफीसाठी एक समिती बनवली असं सांगितलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावरून विरोधी पक्षाने नितीन राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

महाराष्ट्रात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी महावितरणच्या ऑफिसवर मोर्चे काढण्यात आले. तसेच बऱ्याच ठिकाणी कार्यालयाला कुलूप लावण्यात आलं. राज्यामध्ये थकबाकीदार ग्राहकांची विज कापण्याचे आदेश नुकतेच ऊर्जामंत्र्यांनी दिले. तसेच महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना थकबाकीदार ग्राहकांची विज कापण्यासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातून विज कापण्यावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. हे सर्व प्रकरण हाताळू न शकल्याने ऊर्जामंत्र्यांचं पद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. तसेच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हे ऊर्जामंत्रिपद जाऊ शकतं अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘राज्यात भाजपचं सरकार आल्यावर….’; नरेंद्र मोदींनी बंगालच्या जनतेला दिला शब्द

भारीच की! बीएम डब्लूची इलेक्ट्राॅनिक कार लवकरच लाँच, एकदाच करा चार्ज अन्….

राखी सावंतचा फॅन्स सोबतचा क्वालेटी टाईम पाहून तुमचं देखील होईल मनोरंजन, पाहा व्हिडीओ

सावधान! जर तुम्हीही शेअर करत असाल फेसबुक ग्रुपवर ही माहिती

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील टोलवसुलीवरून न्यायालयाचा ‘एमएसआरडीसी’ ला दणका; कॅगला दिले ‘हे’ आदेश

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More