बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; काँग्रेसने केली पोलिसांकडे तक्रार

मुंबई | आपल्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कंगणा राणावतच्या विरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कंगणाचा पद्मश्री पुरस्कार माघारी घेण्यात यावा. कंगणावर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या अनेक नेत्यांकडून करण्यात आल्या आहेत. त्यातच आता मुंबई काँग्रेसने कंगणाविरोधात अंधेरी पुर्व पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.

काँग्रेसने कंगणाच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत कंगणाच्या विरोधात देशद्रोहाच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. कंगणाने केलेल्या वक्तव्याविरोधात एकूणच काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले.

या आंदोलनात कंगणा तसेच मोदी सरकारच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनासाठी माजी खासदार संजय निरूपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक जाधव असे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी कंगणाकडून पद्मश्री काढूण घेण्यात यावा, अशी मागणीदेखील या नेत्यांनी केली आहे.

कंगणा राणावत हिने एका मुलाखती दरम्यान 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे केवळ भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळालं असं व्यक्तव्य केलं होतं. त्यानंतर कंगणाच्या विरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे देशभरातून कंगणावर कारवाई करून तिचा पद्मश्री पुरस्कार माघारी घेण्याची मागणी केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”

रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…- नितेश राणे

“नोटबंदीमुळे आपण कॅशलेस होण्याऐवजी लेसकॅश झालो”

“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात”

‘लगता है मोहतरमा…’; नवाब मलिकांचं कंगणावर टीकास्त्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More