मुंबई | महाविकास आघाडी येणाऱ्या महापालिका निवडणुका एकत्र लढणार का?, याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरु असताना काँग्रेसमध्ये मोठे बदल झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वतंत्र बाण्याच्या नाना पटोले यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. मोदींना नडणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे, त्यामुळे काँग्रेसने कात टाकल्याचं मानलं जातंय. त्यातच आता काँग्रेसने महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केल्याचं समोर येत आहे.
नाना पटोले यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकताच नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार तेथील काँग्रेस कमिट्यांच्या आढावा बैठका घेतल्या. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेव्हलला काम करा आणि स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा, अशा सूचना नाना पटोले यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
राज्यात काँग्रेसला मानणाऱ्या लोकांचं प्रमाण मोठं आहे, सध्या काँग्रेस पक्षाला अनकूल असं वातावरण देखील आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आगामी महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्यासाठी एकदिलाने काम करा, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस पक्षात सर्व समाजघटकांना न्याय देण्याची चांगली भूमिका आहे. आपण सर्वांनी मिळून चांगलं काम केलं तर आगामी विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आगामी विधानसभेसाठी देखील स्वतंत्र लढण्याची चाचपणी करत असल्याचं समोर आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्याच दिवशी मोठा वाद, ‘या’ कारणामुळे भडकले इंग्रज!
“सत्तेत आल्यानंतर हिटलरने देखील मोठं स्टेडियम बांधून स्वतःचं नाव दिलं होतं”
“या कारणामुळेच ‘RSS’च्या चेल्यांनी सरदार पटेलांचं नाव बदललं”
नॅशनल क्रश रश्मिका मंधना लवकरच बॉलिवूडमध्ये, उचललं हे मोठं पाऊल
उत्तर द्या ठाकरे सरकार!; पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं विचारले ‘हे’ 14 प्रश्न
Comments are closed.