मुंबई | लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचे पडसाद काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत उमटलेले पहायला मिळाले. अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
आघाडी असतानाही राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला मदत करत नाहीत. उलटपक्षी राष्ट्रवादी भाजपला मदत करते, असा धक्कादायक आरोप या बैठकीत करण्यात आला.
राष्ट्रवादीला सोबत घेण्याऐवजी आगामी निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या, अशी मागणी देखील या बैठकीत करण्यात आली.
दरम्यान, काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात असंतोष उफाळलेला पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
-विश्वचषक स्पर्धेमुळे पूनम पांडे पुन्हा चर्चेत, केला ‘हा’ फोटो शेअर
-बारामतीचं नियमबाह्य पाणी बंद करा; सांगोल्याच्या शेतकऱ्यांनी केलं फाशी आंदोलन
-बाबासाहेब पुरंदरे म्हणतात देशसेवा म्हणून ‘हे’ काम करावं
-उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीवर काँग्रेसची बोचरी टीका
-उद्धव ठाकरे दहा वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर अशक्यच- रामदास आठवले
Comments are closed.