कोण होणार मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री?; आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेसची खलबतं

भोपाळ| मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसची मुख्यमंत्री निवडण्यासाठीची बैठक सुरु झाली आहे. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चुरस आहे.

केंद्रीय निरीक्षक ए. के. अँटोनी यांच्या उपस्थितीत काँग्रेस आमदारांची बैठक सुरु झाली आहे. भोपाळ विमानतळावर त्यांच्या स्वागतास कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते.

काँग्रेस सत्तेत येणार अशी चिन्हं दिसू लागताच कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदेच्या समर्थकांमध्ये पोस्टर वॉर सुरु झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावर काम करण्यासाठी मी इच्छुक आहे, मात्र पक्ष जो घेईल तो निर्णय मला मान्य आहे, असं ज्याेतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

-कतरिना कैफचा हॉट अंदाज; झिरो सिनेमातील ‘हुस्न परचम’वर प्रेक्षकांच्या उड्या

-नव्या गव्हर्नरचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक आरोप

-कदाचित आता तुम्हाला लोणावळ्याची ही प्रसिद्ध चिक्की खाता येणार नाही!

वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!