बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला नवीन रणनीतीकार भेटला? सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार!

नवी दिल्ली | 2024 मधील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. 2014 मध्ये देशात मोदी सरकारची लाट आल्यानंतर काँग्रेसची पीछेहाट झाली होती. यानंतर काँग्रेसला देशातील बऱ्याच राज्यात पराभव पत्कारावा लागला होता. अशातच आता काँग्रेसने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.

2014 मध्ये देशात मोदी सरकार येण्यापाठीमागे प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. गेल्या काही दिवसांपासून हेच प्रशांत किशोर सातत्याने चर्चेत आहेत. प्रशांत किशोर देशातील अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. आता प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक असल्याचं चित्र दिसत आहे.

प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी विचार करत आहे. यामुळे आगामी काळात प्रशांत किशोर काँग्रेसच्या सल्लागारपदी दिसू शकतात. तसेच काँग्रेसमध्ये आता स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनामुळे सध्या सर्व खासदार दिल्लीमध्ये आहेत. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 14 विरोधी पक्षांच्या जवळपास 100 खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपला घेरण्यासाठीची चर्चा पार पडल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

“राज्यपालांचे वर्तन दुर्दैवी, ते भाजप नेता म्हणून आरएसएससाठी काम करत आहेत”

संसदेत पेगॅसस प्रकरणावरून गदारोळ, राज्यसभेच्या अध्यक्षांनी TMCच्या खासदारांना केलं निलंबित

शहा आणि पवारांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?, संजय राऊत म्हणाले…

प्रियांका चोप्राने मुंबईमधील दोन अलिशान बंगले विकले, ‘इतक्या’ कोटींची झाली डील

भारतासाठी आनंदाची बातमी! रवी दहियाचा धोबीपछाड देत फायनलमध्ये प्रवेश, सुवर्णपदकाची संधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More