बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जो शिशों के घरो मे रहते है…; दोन पाटलांच्या वादात कदमांची उडी

सांगली | जो शिशों के घरो मे रहते है, वो दुसरोंके घरो पे पत्थर फेका नही करते, अशा शब्दात कॉंग्रेस आमदार आणि कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. मंत्री जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात रंगलेल्या वाक-युद्धात कदमांनी उडी घेतली आहे.

महापुराच्या काळात भाजप नेत्यांनी जनतेला काय मदत केली, हे सर्वांना माहित आहे. चंद्रकांतदादांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं चुकीचे आहे. ‘कोरोना’च्या संकटात कोणीही राजकारण करु नये. आता सर्वांनी एकत्रित काम करण्याची वेळ आहे, असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलं.

जयंत पाटील हे मूळ सांगलीचे, तर दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम हेसुद्धा सांगलीतील पलुस कडेगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. जयंत पाटील यांच्यावर टीका होताच ‘सांगली कनेक्शन’ असलेले त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी विश्वजित कदम धावून आलं आहे.

दरम्यान, आता विश्वजित कदम यांनी केलेल्या पाटलांवर लगालवलेल्या टोल्यावर पाटील काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले इतके कोटी रुपये

कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द होणार नाही, परीक्षा होणारच- उच्च-तंत्रशिक्षण मंत्री

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय

मुस्लिमांच्या बदनामीचा प्रयत्न होत आहे- ओवैसी

कोरोनाच्या लढ्यात सुनिल गावसकरांकडून 59 लाख रूपये पण मदतीचा गवगवा नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More