बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे नोटेवरून गांधीजींची प्रतिमा हटवावी, काँग्रेस आमदाराची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली | एका आमदाराने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून दोनशे,पाचशे आणि दोन हजारांच्या नोटात बदल करण्याची मागणी केली आहे. या आमदाराने नोटेवरून गांधींची प्रतिमा हटवण्यात यावी, अशी मागणी केलीये. विशेष म्हणजे ही मागणी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर चक्क काँग्रेसच्याच आमदाराने केली आहे. त्यामुळे सध्या या आमदाराची  मागणी चर्चेचा विषय बनला आहे.

राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी ही मागणी केली आहे. मात्र त्यांनी नोटेवरून गांधी हटवण्याची  मागणी भ्रष्टाचारावर लक्ष वेधण्यासाठी केली आहे. त्यांनी पत्रात लिहीले,”पाचशे आणि हजारांच्या नोटांचा वापर भ्रष्टाचार आणि बारमध्ये केला जात असल्याने गांधीजींचा अपमान होतो. त्यामुळे गांधींचा फोटो नोटेवर नको.”

पुढे त्यांनी पत्रात म्हटलंय की, “गांधींचा फोटो केवळ 2,5,10,20,50, आणि 100 या नोटांवरच असायला हवा कारण या नोटांचा वापर गरीब लोक करतात. गांधीजीनी कायम गरीब लोकांसाठी कार्य केलं. त्यामुळे केवळ या नोटा सोडता वरील सर्व नोटांवरील गांधीची प्रतिमा हटवण्याची माझी मागणी मान्य करण्यात यावी.”

राजस्थानमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे खुप जास्त वाढली आहेत. केवळ जानेवारी 2019 ते डिसेंबर 2020 या काळात राजस्थानमध्ये 616 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. म्हणजे दिवसाला दोन भ्रष्टाचाराची प्रकरणं घडलेली आहेत. त्यामुळे काँग्रेसचे आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून राजस्थानमधील वाढत्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

थोडक्यात बातम्या-

एनसीबी कारवाईबाबत नवाब मलिक करणार मोठा गौप्यस्फोट, तर्कवितर्कांना उधाण

महामार्गासाठी जमीन दिल्यास मिळणाऱ्या मोबदल्यात कपात; शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर

“फोनवरून टिका करणं सोपं आहे, मात्र तिकडे एनसीबीचे लोक लढा देतायेत”

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनित पाठकचा पत्नीसोबतचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

शासकिय आणि निमशासकिय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More