विधानसभेपूर्वीच कॉँग्रेसला झटका! ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर?

Congress | लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला राज्यासह देशात मोठं यश मिळालं. राज्यात महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागांवर विजय मिळाला. या निकालानंतर महायुतीच्या बऱ्याच नेत्यांनी, आमदारांनी पुन्हा मविआची वाट धरली.  महायुतीला सर्वाधिक धक्के उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दिले.

तर, काही ठिकाणी मविआतील नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचं चित्र आहे. अशात कॉँग्रेसमधून (Congress) एक मोठी माहिती समोर येत आहे. लोकसभेनंतर सर्वच पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. अशात कॉँग्रेसला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार जितेश अंतापुरकर-अशोक चव्हाण यांची भेट

काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर भाजपात प्रवेश करु शकतात, अशी जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे. भाजप नेते उपाध्याय यांच्या भेटीनंतर आमदार अंतापुरकर यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतर आमदार अंतापुरकर भाजपात प्रवेश करणार असल्याची नांदेड (Congress) जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ हा नांदेडमध्ये येतो. हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. अशोक चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी कॉँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे.

आमदार जितेश अंतापुरकर भाजपात जाणार?

मात्र, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला लोकसभेत म्हणावा तसा फायदा झाला नाही.भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला. तर, कॉँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण विजयी झाले. अशात आमदार जितेश अंतापुरकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने राजकारणात वेगवेगळ्या (Congress) चर्चा रंगत आहेत.

आमदार जितेश अंतापुरकर यांनी 2021 च्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत 1 लाखापेक्षा जास्त मत मिळवली. त्यांनी भाजपाच्या सुभाष साबणे यांचा 41 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला. सध्या त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा आहेत.

News Title –   Congress Mla Jitesh Antapurkar may Join Bjp 

महत्त्वाच्या बातम्या-

‘मैदानात उतरा आणि ठोकून काढा’; देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

राज्यातील ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ, नागरिकांना मोठा फटका

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा, तो मित्र ठरतोय तिसरा व्यक्ती?

“मी अजित पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”

नागपुरात पावसाचा कहर! गावांना पाण्याचा वेढा, शहरात वीजपुरवठा खंडित; नागरिकांचे हालच हाल