बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिपद न दिल्याने ‘हा’ काँग्रेस आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत?

कोल्हापूर | मंत्रिपद न दिल्याने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर मतदारसंघातील आमदार पी.एन. पाटील हे राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. ते काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देणार असल्याचं समजतंय.

मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी पी. एन. पाटील यांच्यावर दबाव आणल्याचं सांगण्यात येत आहे. पी एन. पाटील समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात सामूदायिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोल्हापूरातून काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. यामुळे पी.एन पाटील हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. पी. एन. पाटील समर्थकांनी त्यांची नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तीनही पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी तर पुणे काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More