बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अडचणीच्या काळात काँग्रेसला आणखी एक धक्का; ‘या’ आमदारानं सोडली साथ

अहमदाबाद | १९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे आमदार बृजेश मेरजा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसला गुजरातमध्ये सातत्याने धक्के बसत आहेत, याआधी काँग्रेसच्या अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. मार्चपासून आतापर्यंत काँग्रेसच्या तब्बल ७ आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत.

गुजरातमध्ये काँग्रेसकडे आता ६५ आमदारांचं संख्याबळ आहे.  यापार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी १९ जूनला होत असलेल्या निवडणुकीला मोठं महत्त्व आलं आहे. ४ पैकी ३ जागा सध्या भाजपकडे तर उर्वरित एक जागा काँग्रेसकडे आहे.

भाजपाने राज्यसभेसाठी अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा आणि नरहारी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. आकडेवारीकडे पाहिली तर भाजपाच्या २ जागा सहज निवडून येतील पण तिसऱ्या जागेसाठी काही मतांची आवश्यकता भासणार आहे, त्यामुळे येत्या काळात गुजरातच्या राजकारणात आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वाढदिवस स्पेशल | नरेंद्र मोदींसोबत पंगा घेणारा माणूस; काय घडला होता नेमका प्रकार?

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला हे माझं एकट्याचं नाही तर तुम्हा सर्वांचं यश”

महत्वाच्या बातम्या-

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रोरो बोटीतून आलिबागकडे रवाना

पुणे जिल्ह्यातील पंचनामे लगोलग पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

“दानशूर उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More