महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत?

मुंबई | मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनामे देण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एक बैठक घेतली. त्यात आरक्षणावरून भाजप सरकारला ठोस निर्णय घेण्यात अपयश आल्याची टीका आमदारांनी केली.

दरम्यान, आरक्षणाबाबत सरकारने वेळकाढूपणा न करता तातडीने निर्णय घ्यावा. यासंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी ही भाजप सरकारची असेल, असा इशारा काँग्रेसने दिला.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर

-चाकण जाळपोळ प्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल

-मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर व्हायला 3 महिन्यांचा अवधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या