नवी दिल्ली | उत्तराखंडमध्ये सध्या आगामी विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत आहे. सर्वच पक्षांमध्ये अटीतटीचा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: काँगेस आणि भाजप यांच्यात या निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे. त्यातच काँग्रेस आमदाराने केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
काँग्रेस आमदार गोविदं सिंह कुंजवाल यांनी येत्या 15 दिवसातच भाजपचे 6 आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. कुंजवाल यांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपमध्ये सध्या भितीचं वातावरण निर्माण झालेलं. आहे. मात्र कुंजवाल यांनी अजून यापैकी कोणत्याही आमदाराचं नाव उघड केलं नाही.
अनेक लोक काँग्रेसमध्ये परत येतील आणि काँग्रेस संपूर्ण बहुमताने राज्यात सरकार स्थापन करेल, असंही ते म्हणालेत. कुंजवाल यांनी केलेला दावा जर खरा ठरला तर भाजपला यामुळे मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे कुंजवाल याचां दावा भाजपसाठी एकप्रकारची धोक्याची घंटाच आहे.
काही दिवसांपूर्वीच कॅबिनेटमंत्री राहिलेले यशपाल आर्या यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला आधीच मोठा धक्का बसला आहे. शिवाय भाजपमधील अजून काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर भाजपला आगामी निवडणुकीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
थोडक्यात बातम्या-
“वाजत गाजत शपथ घेतलीये, लोक झोपेत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही”
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…
“उद्धव ठाकरेंच्या जोरदार भाषणामुळे विरोधकांना चिलमीत गांजा भरुन दम मारो दम करावं लागलं”
“देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे”
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू
Comments are closed.