बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीत बिघाडी?! काँग्रेसच्या ‘या’ आमदाराने अनिल परबांवर केले गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

मुंबई | महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या आरोपांमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याच्या चर्चांणा उधाणं आलं आहे.

मी ज्या विधानसभा क्षेत्रातून आमदार आहे त्या वांद्रे पूर्व विभागात कोरोना लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मी स्थानिक आमदार आहे मात्र मला आमंत्रण देण्यात आलं नव्हते. शिवसेनेचे मंत्री अनिल परब होते, माजी महापौर आणि ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली त्या विश्वनाथ महाडेश्वर यांना बोलावण्यात आलं होतं. इतर नगरसेवक, वॉर्ड अधिकारी होते. मात्र आमदाराला बोलावणं त्यांना गरजेचं वाटलं नसल्याचं म्हणत झिशान सिद्दीकी यांनी आपला संताप व्यक्त केला.

अनिल परबांनी याआधीही मी जे काही काम करत असेल त्यात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. बीएमसी कधी एनओसी देत नाही, कधी उशीरा देतात. जे काही काम मी करण्याचा प्रयत्न करतो त्यात बाधा टाकण्याचा प्रयत्न होतो, मला या दहशतीची सवय आहे. मी काम करत आलो आहे आणि करत राहणार असल्याचं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,वांद्रे पूर्व मतदारसंघातील नागरिकांना माहिती आहे की कोण खरोखर काम करतं. अनिल परब हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी समजून घ्यायला हवं की नागरिकांनी मला निवडून दिलं आहे आणि मला काम करुन द्यायला हवं, असंही सिद्दीकी म्हणाले. यावर अनिव परब काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

आपला कोरोनाशी लढा, पंतप्रधानांशी नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं

1 वर्षाच्या समीशासह शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण!

मोदीजी, बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल, डिझेलवर का काढताय?- रूपाली चाकणकर

राज्यात फक्त ‘या’ वयोगटालाच लसीकरण, आजच निर्णय होण्याची शक्यता

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवणार; ‘हे’ आहे महत्त्वाचं कारण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More