काँग्रेस आमदाराचा रश्मिका मंदानावर गंभीर आरोप, म्हणाला लवकरच पुरावे सादर…

rashmika mandanna

Rashmika Mandanna | कन्नड चित्रपटसृष्टीतून कारकीर्द सुरू करणारी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहण्यास नकार दिल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवी गणिगा (Ravi Ganiga) यांनी केला आहे. त्यांनी रश्मिकाने कर्नाटक व कन्नड भाषेचा अपमान केल्याचे सांगत तिला धडा शिकवावा लागेल, असे वक्तव्य केले आहे.

काँग्रेस आमदाराचा आरोप-

कर्नाटकच्या मंड्या मतदारसंघाचे आमदार रवी गणिगा यांनी विधानसौध येथे माध्यमांशी संवाद साधताना रश्मिका मंदानावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, २०१६ मध्ये ‘किरिक पार्टी’ (Kirik Party) या कन्नड चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रश्मिकाला बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी वारंवार आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, तिने महोत्सवाला उपस्थित राहण्यास स्पष्ट नकार दिला.

गणिगा यांच्या म्हणण्यानुसार, रश्मिकाने कर्नाटक आणि कन्नड चित्रपटसृष्टीचा अनादर केला आहे. तिला अनेक वेळा महोत्सवात सहभागी होण्यासाठी बोलावले असतानाही तिने वेळ नसल्याचे कारण देत ते आमंत्रण धुडकावले. एवढेच नव्हे, तर “माझे घर हैदराबादमध्ये आहे, मला कर्नाटकमध्ये यायला वेळ नाही,” असेही तिने सांगितल्याचा आरोप गणिगा यांनी केला.

विवाद वाढला, भाजपने घेतली आक्षेपार्ह भूमिका-

रश्मिकाच्या या कथित वागणुकीवर गणिगा यांनी संताप व्यक्त केला आणि तिला धडा शिकवावा लागेल, असे विधान केले. मात्र, अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही आमंत्रणास नकार दिल्याचा किंवा कर्नाटकविषयी अपमानास्पद विधान केल्याचा प्रश्नच येत नाही.

दरम्यान, भाजपने (BJP) गणिगा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी गणिगा यांना लक्ष्य करताना काँग्रेसवर टीका केली. त्यांनी ट्विटद्वारे काँग्रेसवर हल्लाबोल करत, प्रत्येक नागरिकाला आपले निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.

News Title : Congress MLA’s Bold Claim Against Rashmika mandanna

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .