मुंबई | कोरोनाला पळवून लावण्यासाठी आता निकाराचा लढा सुरू झाला आहे. सरकार पूर्ण ताकदीने त्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये आपलंही योगदान असावं म्हणून सामाजिक संस्था, उद्योगपती, राजकारणी आपापल्या पद्धतीने मदत करत आहे. अशातच राष्ट्रवादी आणि सेनेपाठोपाठ काँग्रेसनेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व आमदारांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचं ठरवलं आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सामाजिक जबाबदारी ओळखून काँग्रेस पक्षाचे आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तर खासदार पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ट्विट करून त्यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
याशिवाय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे या लढ्यात मदत करू इच्छितात त्यांनी आपली मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, असं आवाहन देखील थोरात यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सेनेचे सगळे आमदार-खासदार आपल्या एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा केली आहे तसंच राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार मदत म्हणून एका महिन्याचा निधी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सामाजिक जबाबदारी ओळखून काँग्रेस पक्षाचे आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला व खासदार पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार आहेत.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळ हस्ते मदत करावी👇#CongressFightsCorona pic.twitter.com/aKnIfGAeSa— Balasaheb Thorat (@bb_thorat) March 29, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!
आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही; अक्षय कुमारकडून 25 कोटींची मदत
महत्वाच्या बातम्या-
‘गरीब शेतकऱ्याच्या श्रीमंत मनाचं’ बाळासाहेब थोरातांकडून कौतुक, म्हणाले ‘आम्हाला आपला सार्थ अभिमान!’
कोरोनाचा संकट जाईपर्यंत शिवभोजन थाळी 5 रूपयांना; मंत्री छगन भुजबळांची घोषणा
नाशिकच्या शेतकऱ्याची दानत, 3 एकर जमिनीपैकी 1 एकर गहू गरजूंसाठी देणार
Comments are closed.