Top News चंद्रपूर महाराष्ट्र

‘पंतप्रधान मोदी यांचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’; राज्यातील काँग्रेसच्या या एकमेव खासदाराचं मोदींना चॅलेंज!

चंद्रपूर| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध लोकसभा निवडणुकीला उभारण्याची  तयारी काँग्रेस खासदाराने दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असं वक्तव्य काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केलं आहे.

भाजप ही आमची पैदास आहे. 1907 मध्ये यांनी प्रवेश केला आणि 1925 मध्ये जन्म घेतला. ज्या पद्धतीने अमेरिकेतून ट्रम्प हद्दपार झाला, त्यापद्धतीने मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय राहणार नाही, असं बाळू धानोरकर यांनी म्हटलं आहे.

बाळू धानोरकर महाराष्ट्रातला एकमेव खासदार नाही. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकत माझ्यामध्ये आहे. आता तीन वर्ष बाकी आहेत. या तीन वर्षाच्या कालखंडात पक्षानं आदेश द्यावा की धानोरकर जा तुम्ही वाराणसीत, असं धानोरकर म्हणाले.

दरम्यान, जर मी गेलो नाही, लढलो नाही आणि जर नाही मोदींचा ट्रम्प केला तर नावाचा बाळू धानोरकर सांगणार नाही, असंही धानोरकर यांनी म्हटलं आहे.  धानोरकर यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांची काय प्रतक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी सोडलं मौन; म्हणाल्या…

त्या माझा आदर करतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, पण आदर दुरूनच करा- कृष्णा हेगडे

लस घेतली म्हणजे आता सर्व काही संपलं असं नाही- उद्धव ठाकरे

लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी अदर पुनावालांनी स्वत: घेतली लस; पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या