काँग्रेस खासदारांकडून ‘फेकु बँके’च्या 15 लाखांच्या नकली चेकचं वाटप

काँग्रेस खासदारांकडून ‘फेकु बँके’च्या 15 लाखांच्या नकली चेकचं वाटप

नवी दिल्ली | संसदेबाहेर काँग्रेस खासदारांकडून फेकु बँकेच्या 15 लाख रुपयांच्या नकली चेकचं वाटप करण्यात आलं. काँग्रेस खासदारांनी नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबल्याची चर्चा संसद परिसरात सुरु होती.

नरेंद्र मोदींनी मागील लोकसभा निवडणुकीत प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याच आश्वासन दिलं होतं, याची आठवण करुन देण्यासाठी आंदोलन करत असल्याचं काँग्रेस खासदारांनी म्हटलं आहे.

फेकु बँकेंच्या चेकवर नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी आणि छायाचित्र देखील छापण्यात आलं आहे.

दरम्यान, भाजप खासदारांना नकली चेक देण्याचा प्रयत्न काँग्रेस खासदारांनी केला मात्र त्यांनी ते स्विकारले नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं- अजित पवार

लखनऊमधून प्रियांका गांधी थेट रॉबर्ट वाड्रांच्या भेटीला

काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

उदयनराजेंच्या हमे तुमसे प्यार कितना…गाण्याला सातारकरांचा टाळ्या शिट्यांनी प्रतिसाद

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुरडीवर मुलाने केला बलात्कार अन बापाने केली हत्या 

Google+ Linkedin