बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“डोळ्यावरील गुलाबी चश्मा उतरवावा, मोदींना ‘सेंट्रल विस्टा’ शिवाय काहीच दिसत नाही”

नवी दिल्ली | कोरोनाच्या महामारीमुळे देशभरातून चिंतेचे सुर उमटत आहे. उत्तरेकडील राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील नद्यांमध्ये कोरोनाने मृत्यु पावलेल्या लोकांचे मृतदेह तरंगताना दिसत आहे. या घटनेमुळे देशभरात हाहाकार माजला आहे. राज्ये कोरोना आकडेवारी लपवत असल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहेत. यातच आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

“देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

सेंट्रल विस्टा प्रकल्प हा देशाच्या नव्या संसदेचा प्रकल्प आहे. देशासाठी नवी संसद बांधण्याचं कामकाज चालू करण्यात आलं आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 971 कोटी रूपये इतका आहे, तो आणखी वाढू शकतो. कोरोनाच्या संकटात देखील या प्रकल्पाचं कामकाज चालू होतं. त्यामुळे देशभरातून या प्रकल्पावर टीका होत आहे. देश आर्थिक संकटातून जात असताना, देशाला नव्या संसदेची गरज नाही, अशी टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांच्यासह देशातील 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून विरोधकांनी नरेंद्र मोदींना कोरोनाच्या संकटामुळे सेंट्रल विस्टाचं काम थांबवण्यासह 9 महत्वाचे सल्ले दिले आहेत.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

धोनीच्या संघातील ‘हा’ खेळाडू बनणार भारतीय संघाचा नवा ऑलराऊंडर, घेणार हार्दिक पांड्याची जागा!

मनसे नेते अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले…

“भर चौकात उभं नाही केलं तर माझं नाव रंजीत रंजन नाही”

100 वर्षांआधीचं ‘हे’ औषध ठरतयं ब्लॅक फंगसवर गुणकारी भारतीय डाॅक्टरचा दावा

फक्त एकच डोस पुरेसा!; ‘या’ लस उत्पादक कंपनीनं भारतासंदर्भात घेतला मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More