देश

बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती देण्याऐवजी महागाई भत्त्यात कपात करणं असंवेदनशील- राहुल गांधी

Loading...

नवी दिल्ली | काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. आजही ट्विट करुन त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही?, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.

कोट्यवधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यकरण परियोजना यांसारख्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करणं हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारनं जास्तीच्या खर्चाला कात्री लावण्याबरोबरच केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त महागाई भत्त्याचा हफ्ता तूर्तास थांबवला आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या