बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

पुणे | अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी गेल्या काही दिवसांअगोदर कोरोनावर मात केली होती. पण आता त्यांची प्रकृती पुन्हा खालवली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला असल्याचं समजत आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली.

माझी आत्ता डॉक्टरांशी चर्चा झाली नाही. मात्र वर्षा गायकवाड या इथेच आहेत. त्यांची डॉक्टरांशी चर्चा झालेली आहे. सातव नॉर्मल वर येत होते. पुन्हा थोडा त्रास झालेला आहे.पण ते लवकरच बरे होतील, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

खासदार राजीव सातव यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने 25 एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होतं. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आलं होतं.

अखेर ते यातून बरे झाले होते आणि त्यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देणार अशा चर्चा असतानाच त्यांची पुन्हा प्रकृती खालावली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या कालपासून मुक्कामी थांबल्या आहेत. तर रजनी सातव आज सकाळी पोचल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाला हरवणारी देशातील सर्वात लहान कोरोना वॉरियर बनली ही चिमुकली, पाहा व्हिडीओ

‘गंगा नदीत तरंगणारे मृतदेह हे….’; कंगणा राणावतचा जावईशोध

‘आम्ही दोघं बाजारात गेलो, तेव्हा…’; आई-वडिल घरात नसताना अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार

‘इथं दिसना, तिथं दिसना’; कोविड सेंटर पेशंट मुक्त झाल्यानं कर्मचारी मनसोक्त नाचला

17 दिवसांपूर्वी झालं होतं लग्न; कोरोनाने उद्ध्वस्त केला नवदाम्पत्याचा संसार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More