Top News देश

काँग्रेस खासदाराचा मोदींच्या जनता कर्फ्यूला पाठींबा; म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूनिमीत्त घरात राहण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या या विनंतीला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

मुंबईसह महत्वाच्या शहरांमधले व्यवहार आज ठप्प झालेले आहेत. विरोधी पक्षात बसलेला काँग्रेस पक्ष मोदींवर टिका करत असताना खासदार शशी थरुर यांनी मोदीच्या जनता कर्फ्यूला पाठींबा दर्शवला आहे.

शशी थरुर हे सध्या आपल्या दिल्लीच्या घरातच असून, त्यांनी आपला फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. घराबाहेर पडून इतरांसाठी त्रास वाढवण्यापेक्षा मी घरी राहून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतोय, असं म्हणत थरुर यांनी मोदींना पाठींबा दर्शवला आहे.

दरम्यान, कोरोनामुळे सध्या देशात गंभीर वातावरण आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रातही सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे

ट्रेंडिंग बातम्या-

जनता कर्फ्यू दिवशी घरी बसून करा ‘हे’ काम; रामदेव बाबांचा भन्नाट सल्ला

एक विषाणू देवावर आणि धर्मावर भारी पडला; संजय राऊत यांचा प्रबोधनात्मक अग्रलेख

महत्वाच्या बातम्या-

जनता कर्फ्यूबाबत रितेश-जेनेलियानं भारतीयांना केली विनंती; पाहा व्हिडीओ

“मोदींनी केलेल्या आवाहनाची खिल्ली उडवू नका… माझे कुटुंब देखील कॉरन्टाईन”

संजय राऊत यांच्या ‘देवांनी मैदान सोडलं’ या अग्रलेखाचं काँग्रेसकडून जोरदार स्वागत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या