चंद्रपूर | चंद्रपूरमधील दारुबंदी उठवा, अशी मागणी राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केली आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.
दारुबंदी हा विषय चुकीचा होता. १५ हजाराच्या मतासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला, असं ते म्हणाले.
दारुबंदी झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. दारुबंदी असली तरी अवैध मार्गाने याठिकाणी हा धंदा चालूच आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, एकट्या चंद्रपूरमध्येच दारुबंदी का? तुमच्या हातात संपूर्ण राज्य आहे, तसेच देश आहे, मग तिथंही दारुबंदी करा, असंही ते यावेळी भाजपला उद्देशून म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेेशाबाबत हर्षवर्धन पाटील म्हणतात…
-पराभव विसरून शरद पवार लागले कामाला; दिल्या शब्दावर ठाम
-इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो,’ मला अजूनही ‘या’ दोन क्रिकेटपटूंची भीती वाटते’
-ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत… बुडत्या नावेत कोण बसणार??- देवेंद्र फडणवीस
-स्वरा म्हणते, ‘ज्यांचा मी प्रचार केला ते उमेदवार हरणार हे मला आधीच माहित होतं, पण…’
Comments are closed.