Top News परभणी महाराष्ट्र

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही- अशोक चव्हाण

 परभणी | काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यंमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत गेले होते. पाहणी करुन झाल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. व त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेसोबत महाआघाडी करण्यासंबंधी अशोक चव्हाण यांनी सांगितले की, “शिवसेनेसोबत जाण्याबाबत दिल्लीमधील नेत्यांमध्ये नाराजी होती. दूसरीकडे राज्यात भाजपकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरु होती. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागले.

अशोक चव्हाण यांना रस्त्यांवरील खड्यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांंनी केलेले खड्डे बुजवण्याचं काम माझ्याकडे असून तेच मी करत आहे. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते पाहिजेत यासाठी मी विमानाने नाही तर कारने फिरत आहे”, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांवर 12 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, राज्यपालांकडे चौकशीची मागणी

विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार!

‘मी 3 वर्षांची असताना….’; अभिनेत्री फातिमा सना शेखचा खळबळजनक गौप्यस्फोट

“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या