काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी?, राष्ट्रवादीचा 144-144चा फॉर्म्युला!

मुंबई | आगामी निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीने 144-144 चा फॉर्म्युला दिल्याची माहिती ‘थोडक्यात’च्या सूत्रांनी दिलीय. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वरील फॉर्म्युला दिला असला तरी काँग्रेसचे नेते या फॉर्म्युल्यासाठी अनुकूल नसल्याचं कळतंय. 

काँग्रेस नेते हायकमांडशी चर्चा करणार असल्याचं कळतंय. राष्ट्रवादीचा फॉर्म्युलाही हायकमांडपुढे ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीशी पुढील चर्चा करण्यात येणार आहे. 

दरम्यान, या बैठकीपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाणिवपूर्वक दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे या विषयाची सध्या जोरदार चर्चा आहे.