बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेत्याचा मोठा दावा, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोटात खळबळ

मुंबई | राज्याचा राजकारणात सध्या अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि 40 आमदारांनी केलेला बंड हा सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरला. महाविकास आघाडी सरकारकडून विकास कामासाठी निधी मिळत नसल्याच्या आणि हिदुत्वांच्या विचारांची फारकत होत असल्याचा आरोप आमदारांनी केला.

येत्या 15-20 दिवसात पुन्हा एखादं राजकीय वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावती निवडणुका लागणार असल्याचा दावा केला. या दाव्याल्या शिवसेना आणि काँग्रेसनेही दुजोरा दिला. मात्र आता काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या संपर्कात आहे, असा दावा भाजप (BJP) नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्येही (congress) काही अलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. मध्यंतरी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. नेत्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी वेळ देत नसल्याचं चव्हाण म्हणाले होते. तर प्रियंका गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी हे नेत्यांकडे लक्ष देत नाहीत. नेत्यांमध्ये यामुळे नाराजी आहे. ते काँग्रेस नेतेे भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार हे अपघाताने आलं आहे. ही युती नैसर्गिक नाही. लोकांना असं वाटत आहे की इथे राहून काही उपयोग नाही. आता भाजपशिवाय पर्याय नाही असं नेत्यांना वाटत आहे. तसेच नेत्यांच्या मनात खदखद आहे. जिथे आपल्या कारकीर्दीला न्याय मिळेल तिथे जांव असं त्यांना वाटत आहे. त्यामुळे ते भाजप सोबत येतील असंही गिरीश महाजन म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या

बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं, पंढरपूरच्या विकासाबाबत केली महत्त्वाची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न, शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

आलियाच्या प्रेग्नंसीबाबत करण जोहरने केला मोठा खुलासा!

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

“शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More