देश

काँग्रेस-राष्ट्रवादीची दिल्लीतील आजची बैठक रद्द!

नवी दिल्ली | राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आज बैठक होणार होती.  मात्र माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम असल्याने आघाडीची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.

आघाडीच्या नेत्यांची ही बैठक उद्या होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते दिल्लीत दाखल झालेले आहेत.

राष्ट्रवादीकडून अजित पवार, नवाब मलिक, सुनील तटकरे तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, के.सी.पाडवी हे सर्व नेते दिल्लीत आहेत.

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेबद्दल निर्णय घेण्यासाठी पुढील एक ते दोन दिवसात आमचे सर्व नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील, असं शरद पवारांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या