औरंगाबाद महाराष्ट्र

काँग्रेस, राष्ट्रवादी एक पाऊल पुढे, प्रकाश आंबेडकरांना 6 जागा सोडण्याची तयारी?

उस्मानाबाद | प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात काल झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला 6 जागा द्यायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी तयार असल्याचं समोर येत आहे. 

आघाडीने 6 जागा देण्याची तयारी दर्शवली असतानाही आंबेडकर यांनी लोकसभेच्या किमान 12 आणि विधानसभेच्या 24 जागा मिळाव्यात, असा आग्रह धरल्याचंही सांगितलं जात आहे.

भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, नुकतेच प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती.  

महत्वाच्या बातम्या-

-शेतकऱ्यांच्या नावावर 2 हजार कोटींचा गैरव्यवहार, कमलनाथ यांचा आरोप

-थोडा धीर धरा, वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसशी आघाडी होईल- आंबेडकर

-नरेंद्र मोदींचं नाव ‘आश्वासनबाज पंतप्रधान’ ठेवावं लागेल- अण्णा हजारे

बाबासाहेब पुरंदरेंचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा; भीम आर्मीची मागणी

…तरचं भारत-पाक संघ आमनेसामने भिडतील!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या