नवी दिल्ली | आश्वासनांची पूर्तता केली नाही तर जनत नेत्यांना झोडपून काढते, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. त्यांनी हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून केल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे.
वारेमाप आश्वासनं देणारे नेते लोकांना आवडतात. मात्र आश्वासनांची पूर्तता केली नाही तर जनता त्यांना झोडपून काढते, असं नितीन गडकरी मुंबईतील एका कार्यक्रमात म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला भलीमोठी आश्वासने देत असले तरी प्रत्यक्षात ती पोकळ ठरलेली आहेत. त्यामुळे गडकरी यांचे हे वक्तव्य मोदी यांनाच उद्देशून आहे, असा दावा काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केला आहे.
गडकरींचं वक्तव्य म्हणजे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-उपाशीपोटी पुण्याच्या रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांना जेवण आणा!
-…म्हणून भर थंडीतही शेतकरी पुण्याच्या रस्त्यावर मुक्काम ठोकणार
-जालन्यात भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण
-शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार; अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
–काँग्रेस नेते आणि कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याचं महिलेसोबत असभ्य वर्तन