औरंगाबाद महाराष्ट्र

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याकडून महादेव जानकरांना खुली ऑफर!

जालना | राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे ओबीसींचे लढाऊ नेते आहेत. त्यांनी काँग्रेससोबत यावं, अशी खुली ऑफर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी जानकरांना दिली आहे.

महादेव जानकर यांच्यावर आमचं 100 टक्के प्रेम आहे. त्यावर काहीही दुमत नाही. ते मेहनत आणि कष्ट करणारे नेते आहेत, असंही राजीव सातव यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात एका मेळाव्यात बोलत होते.

सातव आता तुमचं सरकार आहे. तुम्ही याकडे लक्ष दिलं पाहिजे, आता काय मी मंत्री नाही, असं जानकर म्हणाले. मात्र जानकरांसारखे ताकदीचे नेते आणि कार्यकर्ते सोबत यावं असं कोणाला वाटत नाही. त्यामुळे आमची खुली ऑफर आहे. तुम्ही कधीही विचार करा, असं राजीव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कष्ट करणारा, एखादी मागणी घेऊन काम करणारा असं जानकरांचं नेतृत्व आहे. जानकरांवर आमचं बऱ्याच दिवसापासून लक्ष होतं. त्यामुळे आता मी खुली ऑफर देतो, असं राजीव सातव म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

“गोमूत्र अन् शेणाचं सेवन केल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही”

मुलीच्या लग्नाचं वय 18 असावं की 21; आर्ची म्हणते…

महत्वाच्या बातम्या- 

दिल्लीत भाजपला ‘इतक्या’ जागा मिळतील; सुब्रमण्यम स्वामींनी वर्तवलं भाकीत

“मोदीजी आल्यापासून दहशतवादी बिर्याणी नाहीतर गोळ्या खात आहेत”

राष्ट्रवादीवाले दुष्काळच विसरले! गटनेत्याच्या वाढदिवसाला धुतला पाण्याने रस्ता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या