बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोलेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला दणका, केली ही मोठी घोषणा

मुंबई | आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local body elections) होऊ घातल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा पाढा वाचण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली की काय? असा सवाल उपस्थित केला जात होता. अशातच आता नाना पटोले यांनी पुन्हा महाविकास आघाडीला दणका दिला आहे. (Congress orders to contest elections on its own)

काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका (Municipal Corporation, Zilla Parishad, Panchayat Samiti elections) काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं प्रदेश काँग्रेसने सांगितलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसने महाविकास आघाडीला डच्चू देत स्वबळाचा नारा दिलाय.

नाना पटोले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत जिल्हाध्यक्षांना आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचं देखील देखील प्रदेश काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसच्या या निर्णयामुळे आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण दिसत आहे. स्थानिक नेत्यांना या निवडणुकीत संधी मिळणार आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुखांना मोठा दिलासा?, परमबीर सिंहांबाबत धक्कादायक माहिती उघड

राज्याच्या राजकारणात नवे संकेत, फडणवीस-ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

खासदार असदुद्दीन ओवेसींनी वाहतुकीचा नियम मोडल्याने भरावा लागला 200 रुपयांचा दंड

चला मला अटक करा!, कंगनानं पोस्ट केला वाईन पितानाचा हॉट फोटो

कृषि कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावावर महत्त्वाचा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More