बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींची मुंबई सभा होणार?; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी काँग्रेसचं मिशन मुंबई सुरू होत आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी हे 28 डिसेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा मुंबई दौरा निश्चित झाला असला तरी त्यांच्या मुंबईतील सभेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 28 डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनी राहुल गांधी शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. पण राहुल गांधीच्या शिवाजी पार्कवरील सभेला राज्य सरकारने अद्यापही प्रतिसाद दिला नाही.

राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेला परवानगी मिळावी यासाठी काँग्रेसने (Congress) उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. या सभेच्या परवानगीसाठी काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, काँग्रेसची शिवाजी पार्कवरील पहिली सभा नसली तरी राहुल गांधी यांची मात्र शिवाजी पार्कवरील ही पहिली सभा ठरणार आहे. 2018 साली राहुल गांधींना या मैदानावरील सभेसाठी परवानगी नाकारली होती. त्यामुळे राहुल गांधीची यंदा शिवाजी पार्कवर सभा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“त्यांच्या बापाशी लढून मी पक्षाबाहेर पडलोय, नाना पटोले कुणाच्या…”

कपिल देवची इंग्रजी ऐकली का? 83चा व्हिडीओ तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

Second Dose घेतलाय का? नसेल तर भरावा लागणार 500 रूपये दंड

मराठवाड्याचं टेंशन वाढलं! ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

“जेव्हा औरंगजेब येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More