मुंबई | काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्र्यांविरोधातील काँग्रेसची पोलखोल यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. पोलखोल यात्रा 20 ऑगस्टला सुरू होणार होती मात्र आता ही यात्रा 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस नेते नाना पटोले पोलखोल यात्रा काढणार आहेत. गेल्याच आठवड्यात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला होता.
मुख्यमंत्र्यांचे काम दुसऱ्या बाजीरावासारखे आहे. मुख्यमंत्री जसा वागतो तसेच त्याच्या मंत्रिमंडळातील सहकारी वागतात, असा टोला त्यांनी लगावला होता.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गेल्या 5 वर्षांत जनतेला कसं फसवलं, हे मी लोकांसमोर जाऊन मांडणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“विरोधी पक्षातील 5 ते 6 सहा आमदार माझ्या संपर्कात; लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार”
–…नाहीतर लोकांना तुमची धुलाई करायला लावेल- नितीन गडकरी
-बिग बॉसच्या घरातील ‘हा’ स्पर्धक बाहेर!
-“नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस चालवणं कठीण आहे
-“जेएनयू विद्यापीठाला मोदींचं नाव द्या, मोदींच्या नावावरही काहीतरी असावं”
Comments are closed.