Top News देश

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक डिजीटलपद्धतीने होणार!

नवी दिल्ली | काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं असून पक्षाचा अध्यक्ष डिजीटलपद्धतीनेच निवडला जाणार आहे.

पक्षाचा अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाला डिजीटल आयडी कार्ड जारी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीने मतदार यादीही तयार करण्यास सुरुवात केली आहे.

या निवडणुकीत सुमारे 1500 प्रतिनिधी भाग घेणार आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांनाच पुन्हा अध्यक्षपद देण्याची काँग्रेसकडून तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यामुळे या जागेवर निवडणूक होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेनेच्या भगव्यात भेसळ, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली”

विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार!

वीजबील माफीवरून मनसे आक्रमक, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फूटांचा पुतळा जाळणार!

भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड लसीच्या वितरणाला सुरुवात; ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार लस

‘अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या