महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा; नाना रिंगणात तर बाबांच्या हाती छडी!

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा पडलेला असताना राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यातच आता काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा सुरु झाली असून आक्रमक नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद तसेच अनुभवी पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचं अध्यक्षपद दिलं जाण्याची चर्चा रंगली आहे.

विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते, मात्र काही कारणास्तव ही भेट होऊ शकली नाही.

सध्या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. महसूल मंत्रिपद, महाविकास आघाडीशी समन्वय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशी तिहेरी जबाबदारी त्यांना सांभाळावी लागत आहे.

दुसरीकडे अनुभवी असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सध्या कोणतंही मंत्रीपद नाही, कोरोना काळात त्यांनी केंद्र सरकार तसेच भाजपला आपल्या आरोपांनी सळो की पळो करुन सोडलं आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्यासाठी काँग्रेसमध्ये या अंतर्गत घडामोडी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

नेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप

कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ 2 गोष्टी सातत्याने करा; आरोग्य मंत्रालयाची नागरिकांना सूचना

महत्वाच्या बातम्या-

अक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण

…म्हणून महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण

दिलदार शेतकरी! आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना घरी जाण्यासाठी विमानाची तिकीटं दिली काढून

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या