बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत सामील!

नवी दिल्ली | आज शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या केरळमधील एका बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. केरळमधील काँग्रेसचे नेते पी.सी चाको यांनी शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केरळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी पी सी चाको यांनी काँग्रेस पक्षाला आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर तेथील काही काँग्रेस नेत्यांनी चाको यांना जनाधार नसल्याने त्यांच्या राजीनाम्याने पक्षाला काही फरक पडत नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

शरद पवार आणि पी सी चाको यांच्यात गेल्या वीस वर्षांहूनही अधिक जुने हितसंबंध आहेत. शरद पवारांनी काँग्रेस सोडून जेव्हा काँग्रेस एसची स्थापना केली होती तेव्हा चाको यांना केरळचे प्रदेशाध्यक्षपद सोपवले होते. काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी होत असल्याने आपण पक्ष सोडल्याचं पी.सी चाको यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून केरळ काँग्रेस मधून बाहेर पडलेले चाको हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. चाको यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केल्याने सर्व चर्चांना विराम मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या

सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; तीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले!

पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील आगीत लाखोंचं नुकसान; कोंबड्या, बकऱ्या होरपळल्या!

संतापजनक! दारूच्या नशेत वडिलांनी केली जबरदस्ती; काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल!

अंबानींच्या घरासमोर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती सचिन वाझे?; ‘फॉरेन्सिक पोडियाट्री’द्वारे होणार तपास!

‘तो येऊन जबाब देऊन गेला, पण महाविकास आघाडी सरकारने काय केलं?’; फडणवीसांचा सरकारवर घणाघात!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More