देश

देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या- राहुल गांधी

नवी दिल्ली | भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न असल्याचं काही दिवसांपूर्वी राहुल यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता परत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कागदपत्र हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलंय.

जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या आहेत, असा टोला राहुल यांनी मोदी सरकारला लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या. मल्ल्या असो की राफेल, निरव मोदी असो की चोक्सी हरवलेल्या यादीमध्ये आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा देखील समावेश झाला आहे. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी  सरकारवर केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

पापड खाल्ल्यानं कोरोना बरा होतो असा दावा करणाऱ्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यालाच कोरोनाची लागण

“ज्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही त्यांच्या हेतूवर शंका; पडद्यामागून कोण हालचाली करतंय हे मला माहितीये”

गुगल त्यांची सर्वात प्रसिद्ध असलेली ‘ही’ सुविधा बंद करणार…!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…..

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या