बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला अन् मला दिल्लीत आशीर्वाद मिळाले”

मुंबई | मराठवाड्याचे काँग्रेस नेते आणि दिवंगत राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाने राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. आता भाजपचे राज्यसभेचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. यावर रजनी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्रे फडणवीस यांची भेट घेतली होती. एखाद्या नेत्याचं निधन झालं तर त्याठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी, तसेचं ही महाराष्ट्राची परंपरा आहे ,असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. भाजपने उमेदवार मागे घेतल्याने ही परंपरा कायम राहिल्याच दिसतं आहे.

त्यावर बोलताना रजनी पाटील यांनी भाजपने समजुतदारपणाने मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानते असं म्हटलं आहे. तसेच राजीव सातव हे माझ्या लहान भावाप्रमाणे होते. आज त्यांची मला आठवण येत आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तर सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला आणि मला दिल्लीत आशीर्वाद मिळाले, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राज्यसभेला संधी दिल्याने रजनी पाटील यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांचे आभार मानले आहेत. त्याबरोबर भाजपने आपला उमेदवर मागे घेतल्यानं महाराष्ट्रातील राजकीय परंपरा कायम राहिली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर ‘त्या’ आमदारावर गुन्हा दाखल करावा’; संभाजी ब्रिगेडची पोलीस आयुक्तांकडे मागणी

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर

पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगा, आदित्य ठाकरेचा मला अभिमान – उद्धव ठाकरे

“पवारसाहेब जिद्धीने लढले म्हणून आपल्याला यश मिळालं”

पंकजा मुंडेंना मोठा धक्का! ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे भाजप नेत्यांच्या अडचणीत वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More