काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश!

काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश!

नवी दिल्ली | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे मंगळवारी त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसमध्ये गेल्या 15 वर्षात जे झालं ते कधीही झालेलं नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्व शुन्य आहे. भाजपच्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेने प्रेरित होऊन मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया संजय सिंह यांनी दिली आहे.

दरम्यान, संजय सिंह यांच्यासह त्यांच्या पत्नी अमिता सिंह यादेखील काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-इस्रोच्या मोहिमांवर-मोहिमा अन् मोदी सरकार त्यांचा पगारात कापतंय

-काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही- चंद्रकांत पाटील

-…म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस दिसणार ‘या’ दिवशी एकाच मंचावर!

-भाजपात जाणाऱ्या पिचडांविरोधात मतदारसंघातली जनता ‘या’ कारणामुळे आक्रमक!

-पवारांची साथ सोडताना अन् भाजप प्रवेश करताना शिवेंद्रराजेेे म्हणतात…

Google+ Linkedin