महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला!, असा असेल फाॅर्म्युला?

मुंबई | लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवर आल्या आहेत. यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती मिळत आहेत.

आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला आहे. तर उरलेल्या 8 जागा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसह मित्र पक्षांना सोडण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

भाजपला पराभूत करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्धार केला आहे. त्यासाठी आघाडीत मित्रपक्षांना एकत्र घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यावर काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-“…तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन”

-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’

नाशिकच्या तरुणांनी बनवली अनोखी स्पोर्टस कार; भारतातले पहिलेच डिझाईन

-काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

-एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाचा ‘यांना’ मोठा दणका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या