बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसने उडवली प्रकाश आंबेडकरांची खिल्ली; ‘त्यांचा एकही आमदार आमच्या संपर्कात नाही’

मुंबई |  राष्ट्रवादीच्या 10 आमदारांसह महाराष्ट्रातील संपूर्ण काँग्रेसच माझ्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोट भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या याच गौप्यस्फोटाची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा एकही आमदार आमच्या संपर्कात नाही… त्यांच्या ‘गौप्यस्फोटावर’ आमचा हा ‘हास्यस्फोट’… असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आंबेडकरांची खिल्ली उडवली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे कोणते 10 आमदार आणि राज्यातले कोणते काँग्रेस नेते  आहेत? त्यांची नावे मात्र आंबेडकरांनी सांगितलेली नाहीत.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरू शकतात, असं भाकित वर्तवलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-विखे पाटलांनी राजीनामा दिल्यावर काँग्रेस आक्रमक; विखेंवर केला हल्लाबोल

-राष्ट्रवादीचे 10 आमदार आणि राज्यातील संपूर्ण काँग्रेसच माझ्या संपर्कात- प्रकाश आंबेडकर

-…म्हणून आगामी निवडणुकीत राज ठाकरे किंगमेकर बनू शकतात; प्रकाश आंबेडकरांचंं भाकित

-…म्हणून मला घाई-गडबडीत लग्न करावं लागलं; अमिताभ बच्चन यांचा खुलासा

-अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘हाताची साथ सोडली’; जाता जाता काँग्रेसचे टेन्शन वाढवणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More