पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने केली ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

औरंगाबाद |  गेल्या काही दिवसांपासून पक्षाविरोधी भूमिका घेणारे काँग्रेसचे औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. औरंगाबाद लोकसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे सत्तार नाराज होते.

सत्तारांच्या हकालपट्टीची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सत्तार हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात.

अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता. परंतू त्यांनी तो अर्ज मागे घेऊन दानवेंच्या जावयाला म्हणजे अपक्ष उभे राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, सत्तारांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेटही घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

-हार्दिक पांड्या म्हणतो, माझ्या ‘हेलिकाँप्टर शाॅट’वर धोनीपण फिदा!

-राम मंदिर नाही तर मोदी पण नाही- कम्प्यूटर बाबा

-जेट एअरवेजनंतर आता एअर इंडियाही अडचणीत येण्याची शक्यता!

-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनी केलं लग्न

-रोमॅंटिक गाण्याप्रकरणी माफी मागा; शिवसेनेची अमोल कोल्हेंकडे मागणी