महाराष्ट्र मुंबई राजकारण

रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी म्हणजे मोदींनी पर्रिकरांचा केलेला अनादर- काँग्रेस

मुंबई | देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या नियुक्तीनंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसने नियुक्तीला विरोध दर्शवत भाजपवर टीका केली आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनाला महाराष्ट्र भाजपने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या ट्विटला रिट्विट करत सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. चौकीदाराने केलेला राफेल घोटाळा सहन न झाल्याने संरक्षणमंत्री पदाचा त्याग केलेल्या स्व. मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं सावंत म्हणाले आहेत.

राफेल घोटाळा झाकण्यासाठी ज्यांनी मदत केली ते याच काळात राज्यसभेवर नियुक्त केले जाणे हा पर्रिकरजींचा मोदी सरकारने केलेला अनादरच म्हणावा लागेल, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, गोगोईंनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला होता. जवळपास 13 महिने त्यांनी सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली. गेल्यावर्षी 17 नोव्हेंबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते. गोगोई यांनी आपल्या कार्यकाळात अयोध्या खटला आणि शबरीमाला मंदिरासारख्या महत्त्वपूर्ण प्रकरणांचा निकाल दिला होता.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर… – रामदास आठवले

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

महत्वाच्या बातम्या-

“कोणतीही लक्षण नाहीत तरी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला; दुर्लक्ष करू नका घरीच बसा”

“मुंबई लोकल 7 दिवस बंद ठेवल्यास कोरोना संसर्ग टाळता येईल”

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या