महाराष्ट्र मुंबई

“भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”

मुंबई | सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणात बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहारमधील राजकीय नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली होती. त्यापाठोपाठ महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनीही मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

भाजपकडून होत असलेल्या आरोपांना काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय. भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे, अशा शब्दात काँग्रेसनं भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला. बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे, असा हल्लाबोल सावंत यांनी केलाय.

 

महत्वाच्या बातम्या-

पावसामुळे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील छताचा भाग कोसळला

पाच दिवसात सोने दरात मोठी वाढ; पाहा काय आहे आजचा भाव…

परदेश शिष्यवृत्तीबाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

‘या’ तारखेपासून शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार

सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या