संघाचं निमंत्रण राहुल गांधी स्वीकारणार का?; …अखेर काँग्रेसनं दिलं उत्तर

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना निमंत्रण देणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी चर्चेला पूर्णविराम देणारं उत्तर दिलं आहे. 

हे निमंत्रण आगामी निवडणुका डोळयांसमोर ठेवून पाठवण्यात आलं आहे. परंतु राहुल गांधी किंवा काँग्रेसचे कुणीही अन्य नेते संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं खर्गे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी राहुल गांधींना संघाकडून कोणतेही अधिकृत पत्र आले नाही, हेही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-गौरी लंकेश हत्या प्रकरणी आणखी एकाला अटक; कर्नाटक एटीएसची कारवाई

-त्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल

-…तर सातारकर तुम्हाला माफ करणार नाही; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना इशारा

-खड्ड्यांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन

-पोलिसांनी कारवाई करताना डावं-उजवं बघू नये, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना थेट आदेश